शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

By admin | Updated: April 1, 2015 15:18 IST

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीकर परदेशी यांच्यासाठी आता अच्छे दिन आले असून परदेशी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी बढती देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. १ - कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीकर परदेशी यांच्यासाठी आता अच्छे दिन आले असून परदेशी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी बढती देण्यात आली आहे. परदेशी सध्या राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदी कार्यरत होते. 
पुण्याच्या आयुक्तपदी कार्यरत असताना श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला होता. राजकीय दबावाला झुगारुन परदेशी यांनी कारवाई सुरु केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. मात्र तत्कालीन सत्ताधा-यांनी परदेशी यांची आयुक्तपदावरुन बदली करत थेट मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागात पाठवले होते. परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात पुणेकरांमध्ये नाराजीचे वातावरण होते.  मात्र परदेशी यांच्या कार्याची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. 
केंद्र सरकारने चार आयएएस अधिका-यांची पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदी नियुक्ती केली आहे. यात परदेशी यांच्यासह गुलजार नटराजन, ब्रिजेश पांडे, मयुर महेश्वरी यांचाही समावेश आहे. परदेशी हे २००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. नांदेड मुख्याधिकारी, पुणे आयुक्त, मुद्रांक व नोंदणी विभागाचे महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम केल्यावर परदेशी यांनी थेट दिल्ली गाठली आहे. दिल्लीत त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.