मुंडेच्या अपघाताची चौकशी व्हावी - शेडगे

By Admin | Updated: June 3, 2014 11:03 IST2014-06-03T11:03:18+5:302014-06-03T11:03:33+5:30

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त होत असल्याने या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी केली आहे.

Should be questioned about Munde's accident - Shheda | मुंडेच्या अपघाताची चौकशी व्हावी - शेडगे

मुंडेच्या अपघाताची चौकशी व्हावी - शेडगे

ऑनलाइन टीम

बीड, दि. ३ - केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त होत असल्याने या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी केली आहे. मुंडेचा सत्कार करण्याचे स्वप्न अधूरेच राहिले अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 
गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले. यापार्श्वभूमीवर बीडमधील आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी ही मागणी केली आहे. दिल्लीत सकाळी सहाच्या सुमारास फारशी वाहतूक नसते. अशा स्थितीत हा अपघात झाल्याने काही जणांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी प्रकाश शेडगे यांनी केली. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने आज आम्ही मुंडेचा परळीत भव्य सत्कार करणार होतो. मात्र आता हा सत्कार कधीच करता येणार नाही अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मुंडेच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणार आहे. राजकीय विरोधक असूनही द्वेषभावना न ठेवणारे मुंडे हे एकमेव नेते होते अशी प्रतिक्रिया मुंडेविरोधात निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी दिली. 

Web Title: Should be questioned about Munde's accident - Shheda