शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ५ वर्षांत २११ आत्महत्या

By admin | Updated: December 2, 2014 00:38 IST

उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.

शुक्रवार तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’ : टेहळणी वाढविण्याची आवश्यकतानागपूर : उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात पोलीस विभागाकडे विचारणा केली होती. शुक्रवार तलावात गेल्या पाच वर्षांत किती नागरिकांनी आत्महत्या केल्या, त्यात किती महिला व पुरुषांचा समावेश होता, अशा आशयाची विचारणा करण्यात आली होती. यावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार २०१० सालापासून २११ नागरिकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. यात १९२ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे तर १५ वर्षांखालील एका बालकानेदेखील २०१२ साली आत्महत्या केली होती.सर्वात जास्त ५२ आत्महत्यांची नोंद २०१२ साली करण्यात आली होती. तर २०१४ मध्ये ३० आॅगस्ट २०१४ पर्यंत २५ नागरिकांनी शुक्रवार तलावात उडी घेऊन जीव दिला आहे. दरम्यान, तलावात जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या किती जणांना वाचविण्यात यश आले याची नोंद उपलब्ध नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले. शुक्रवार तलावाजवळ टेहळणी वाढविण्यात यावी व कायमस्वरूपी पोलिसांची येथे तैनाती व्हावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अश्लील चाळे रोखण्यासाठी कारवाई हवीदरम्यान, नागपुरातील अंबाझरी व फुटाळा उद्यानात जोडप्यांकडून मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे करण्यात येतात, अशी तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. परंतु माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत अंबाझरी उद्यानात ५९ तर फुटाळा उद्यानात ५७ जण सापडल्याची बाब समोर आली. येथे होणाऱ्या अयोग्य बाबी रोखण्यासाठी कारवाईचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.