‘विक्रांत’साठी शिवसेना रस्त्यावर

By Admin | Updated: May 29, 2014 03:29 IST2014-05-29T03:29:27+5:302014-05-29T03:29:27+5:30

भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्‍या ‘आयएनएस विक्रांत युद्धनौके’चे संग्रहालयात रूपांतरण करण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा आवाज उठविला

Shivsena road for 'Vikrant' | ‘विक्रांत’साठी शिवसेना रस्त्यावर

‘विक्रांत’साठी शिवसेना रस्त्यावर

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्‍या ‘आयएनएस विक्रांत युद्धनौके’चे संग्रहालयात रूपांतरण करण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा आवाज उठविला. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील लायन गेटसमोर बुधवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. विक्रांत जहाज जनतेचे; नाही कुणाच्या बापाचे, भारत-पाक युद्धात यशस्वी कामगिरी करणारे विक्रांत जहाज वाचवा, ऐतिहासिक भारत-पाक युद्धाची साक्षीदार विक्रांत युद्धनौका वाचवा, अशा आशयाचे संदेश निदर्शने करणारांनी या वेळी फलकांच्या माध्यमांतून दिले. विक्रांतचे ‘नाविकी संग्रहालय’ म्हणून जतन, संवर्धन होणे हे लोकाग्रहाला धरून आहे. इतर देशांप्रमाणे भारताचे स्वत:चे युद्धनौकाप्रणीत नाविकी संग्रहालय नाही. जेणेकरून नाविकी प्रशिक्षण, शिवाय इतिहास व सैनिकी शास्त्र यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल, असे म्हणणेही निदर्शने करणारांनी या वेळी मांडले.

Web Title: Shivsena road for 'Vikrant'