शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

असंतुष्टांवर शिवसेना, राष्ट्रवादीचा डोळा

By admin | Updated: September 26, 2014 01:20 IST

युती व आघाडी तुटल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस, भाजपकडे सक्षम उमेदवाराची मोठी यादी आहे. या दोन्ही पक्षाचे उमेदवार

काटोल, रामटेकसाठी भाजपचा ‘सर्च’ नागपूर : युती व आघाडी तुटल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस, भाजपकडे सक्षम उमेदवाराची मोठी यादी आहे. या दोन्ही पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. शिवसेनेने नऊ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली असून उर्वरित तीन मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांवर डोळा आहे तर राष्ट्रवादी हिंगणा व काटोल वगळता उर्वरित मतदारसंघात काँग्रेसला फूस लावण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसने आठ मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. कामठी व उमरेडचे उमेदवार जाहीर व्हायचे आहे. आता काटोल व हिंगणा मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे. हिंगण्यात युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत, भीमराव कडू, माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर यांची नावे आघाडीवर आहेत. काटोलमध्ये जि.प.चे माजी अध्यक्ष शेखर कोल्हे, प्रकाश वसू, दिनेश ठाकरे, चरणसिंग ठाकूर यांचाही विचार केला जाऊ शकतो. आजवर शिवसेनेकडे असलेल्या काटोल व रामटेक मतदारसंघात भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. काटोलमध्ये उकेश चव्हाण, मनोज कोरडे, विजय चाफले तर रामटेकमध्ये जयंत खळतकर, कमलाकर मेंघर, संजय मुलमुले यांची नावे चर्चेत आहेत. येथे काँग्रेसकडून निराश झालेल्या उमेदवारांवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात मोठे राजकीय फेरबदल पहायला मिळू शकतात. शिवसेनेने नऊ उमेदवार जाहीर केले. ग्रामीणमध्ये कामठी व सावनेर राखून ठेवला आहे. कामठीसाठी जि.प.च्या राजकारणात सक्रिय असलेल्या आपल्याच पक्षाच्या तगड्या कार्यकर्त्याला उमेदवारीसाठी गळ घातली जात आहे. सावनेरमध्ये भाजपमधील असंतुष्टाच्या हाती ‘धनुष्य’ देण्याची तयारी सेनेने चालविली आहे. राष्ट्रवादीची यादी रात्री उशिरापर्यंत तयार व्हायची होती. काटोलमधून अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आणि हिंगण्यातून माजी मंत्री रमेश बंग यांची उमेदवारी पक्की आहे. सावनेर, कामठी, उमरेड, रामटेक या मतदारसंघातही तगडे उमेदवार देण्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला. पूर्व नागपुरात अतुल लोंढे, दुनेश्वर पेठे, पश्चिम नागपुरात सलील देशमुख, नगरसेविका प्रगती पाटील, उत्तर नागपुरात वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, दक्षिण नागपुरात नगरसेवक राजू नागुलवार, सुनील राऊत, मध्य नागपुरात कामील अन्सारी, राजेश कुंभलकर व दक्षिण-पश्चिम नागपुरात निशिकांत काशीकर, शेखर रोकडे यांची नावे चर्चेत आहेत. (प्रतिनिधी)दक्षिणमध्ये भाजपपुढे पेच शिवसेनेच्या कोट्यात असलेली दक्षिण नागपूरची जागा हिसकावण्यासाठी भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपचे नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आ. मोहन मते यांनी दावा केला आहे. शिवसेनेने येथे किरण पांडव यांना रिंगणात उतरविल्याने भाजपला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.