स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनेचा इशारा

By Admin | Updated: September 4, 2014 00:58 IST2014-09-04T00:58:20+5:302014-09-04T00:58:20+5:30

स्वतंत्र विदर्भावरून शिवसेना-भाजपात आता चांगलीच जुंपली आहे. भाजप असो की अन्य कुणी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही,

Shiv Sena's warning from independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनेचा इशारा

स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनेचा इशारा

महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही-शिवसेना, स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा-फडणवीस 
मुंबई : स्वतंत्र विदर्भावरून शिवसेना-भाजपात आता चांगलीच जुंपली आहे. भाजप असो की अन्य कुणी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेनेने आपल्या मुखपत्रतून दिला आहे. तर स्वतंत्र विदर्भास भाजपाचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केला आहे.
भाजपाचे नेते हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत तर महाराष्ट्राचे विभाजन करण्यास शिवसेनेचा सक्त विरोध आहे. या विषयावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी सावधपणो मिठाची गुळणी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नेमक्या याच विसंगतीवर बोट ठेवत महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला. तोच मुद्दा पकडून शिवसेनेने आपल्या मुखपत्रतून चव्हाण यांचे अभिनंदन करीत भाजपा असो की अन्य कुणी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, असे ठणकावले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही स्वतंत्र विदर्भास तीव्र विरोध होता. अनेकदा जाहीर भाषणातून त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीवर टीका केली होती, याकडेही शिवसेनेने भाजपाचे लक्ष वेधले आहे. 
 
केंद्रातील सरकारकडे भक्कम बहुमत असून भाजपाचे नेते छोटय़ा राज्याचे समर्थन करीत आले आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या मुजोरीमुळे विदर्भावर अन्याय होत असल्याचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे. त्यामुळे या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाचा केवळ विचारही करू नये, असे शिवसेनेने सुचवले आहे.

 

Web Title: Shiv Sena's warning from independent Vidarbha