राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:23 PM2021-09-15T17:23:05+5:302021-09-15T17:23:55+5:30

सीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी, शेलार यांची मागणी

Shiv Sena should stop the business of political identity ashish shelar criticize maharashtra | राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

Next
ठळक मुद्देसीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी, शेलार यांची मागणी

परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याच सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांच लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे. 

"NRC ला शिवसेनेचा विरोध आहे मग परराज्यातील नागरिकांची नोंदवहीचा पुरस्कार कसा करता असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी," अशी मागणी ॲड शेलार यांनी केली. गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत असं सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्यावं, असंही शेलार म्हणाले.

बालहट्टापायी मुंबईची प्राथमिकता बदलली
पेंग्विनच्या टेंडरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ॲड आशिष शेलार म्हणाले, बालहट्टापायी मुंबई शहराची प्राथमिकता महापौर आणि शिवसेनेने बदलली आहे. ४३७ स्वे किमीच्या मुंबईतील २०५५ किमीवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॅार्डला २ कोटी म्हणजे १ कोटी ४० लाख मुंबईकरांसाठी फक्त ४८ कोटी खर्च करणार पण तेच एका पेग्विंनसाठी १५ कोटी खर्च करणार आहेत.  यावरुन प्रशासकीय रचना बालहट्टासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे दिसतंय. यात मुंबईकरांच्या हिताचा विचार नाही आहे. पेग्विंनमुळे आमदनी वाढली असं आयुक्तांचं वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची टीका त्यांनी केली. तसंच पेग्विंन आणा आणि तुमच्या खुर्च्या खाली करा असेही ते म्हणाले.

Web Title: Shiv Sena should stop the business of political identity ashish shelar criticize maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app