शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:57 IST

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली.

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: सरहदच्या वतीने  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले.

उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर ते गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगले काम केलेले त्यांना आवडत नाही. मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का, त्यांना काय माहीत आहे. भाषण करणे वेगळे आणि तळागाळात जाऊन काम करणे वेगळे. ते फक्त पोपटपंची करतात, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत

संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, हे आश्चर्य आहे. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. तो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा सत्कार आहे. त्याचा बहुमान एकनाथ शिंदे यांना मिळाला याचा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख स्मारक ट्रस्टचे अध्यक्षपद काढू नका, हे सांगण्यासाठी हे लोक मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. विनवण्या करण्यासाठी फिरत असतात, अशी खोचक टीकाही संजय शिरसाट यांनी केली. 

तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात

एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसे वाईट बोलायचे हेच काम आता त्यांचे राहिले आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलंय का. हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत, असे सांगत शिरसाट यांनी हल्लाबोल केला. 

अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले

अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले. संजय राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत. शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झालो, असे शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवार