शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

“चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका”; शिंदे गटाची रवी राणा यांना समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:57 IST

Ravi Rana Vs Shiv Sena Shinde Group: रवी राणा यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Ravi Rana Vs Shiv Sena Shinde Group: पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या याजनेवरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर आरोप केले आहेत. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून महायुतीवर टीकास्त्र सोडले. यावरून आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी रवी राणा यांना समज दिली आहे. 

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करु, तर आता यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून १५०० रुपये वापस घेणार, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. यावरून गदारोळ झाल्यानंतर रवी राणा यांनी घुमजाव केले. आपण गमतीने हे वक्तव्य केले.  कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे, असे रवी राणा म्हणाले.

चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी केलेल्या विधानावरून समज दिली आहे. रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हटले असतील तरी ते चुकीचेच आहे. विनोदातही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करु नका, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बहीण भावाचे नाते आपुलकीचे असले पाहिजे. जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असे वक्तव्य केले नव्हते. भाऊ हा बहिणीचे कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. काँग्रेसने खोटे बोलून मतदान घेतले, पण हे सरकार तसे करणार नाही, अशी सारवासारव रवी राणा यांनी केली.

 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलRavi Ranaरवी राणाRavi Ranaरवि राणाShiv Senaशिवसेना