लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. २१ जानेवारीला सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही, तर २२ रोजीसुद्धा सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेनेचे नाव व निवडणूक चिन्हाशी संबंधित याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. दोन्ही पक्षांतील हे प्रकरण दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. अशात, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीनेच २१ जानेवारीला पुढील सुनावणी होईल.
दोन्ही गटांना युक्तिवाद करण्यासाठी तीन तास वेळ
एका दिवसात सुनावणी पूर्ण होऊ नाही शकली तरी दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रकरण ऐकून घेतले जाईल. यामुळे २२ जानेवारीला कोणतेही महत्त्वाचे प्रकरण सूचिबद्ध करू नये, असे निर्देश सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मागच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना दिले होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना अंतिम युक्तिवाद करण्यासाठी प्रत्येकी तीन-तीन तासांची वेळ देण्यात आली आहे.
Web Summary : The Supreme Court will hear the case regarding the Shiv Sena and NCP party symbols. Hearings begin Wednesday, with a possible extension to the 22nd if needed. Each faction gets three hours for arguments to resolve the long-pending dispute.
Web Summary : शिवसेना और एनसीपी के पार्टी चिह्नों पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई होगी। सुनवाई बुधवार से शुरू, जरूरत पड़ी तो 22 तक बढ़ सकती है। लंबे समय से लंबित विवाद को सुलझाने के लिए प्रत्येक गुट को बहस के लिए तीन घंटे मिलेंगे।