shiv sena mp sanjay raut indirectly hits out at bjp | हवा, स्वातंत्र्य अन् फुगे; संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा
हवा, स्वातंत्र्य अन् फुगे; संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना खासदार संजय राऊत दररोज ट्विटमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आहे. शेर, शायरी यांच्या माध्यमातून राऊत दररोज भाजपाला लक्ष्य करत आहे. आजही त्यांनी एक शायरी ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे.

हवा को गुमान था, अपनी आज़ादी पर. किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. पहिल्या २० मिनिटांतच त्यांचं हे ट्विट दीड हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर जवळपास ३०० जणांनी ही शायरी रिट्विट केली आहे. काल राऊत यांनी वक्त चित्रपटातील राजकुमार यांचा डायलॉग वापरुन भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरों के घर पत्थर नहीं फेका करते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा निर्माण झाला. त्यावेळी भाजपावर दबाव वाढवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. सामनामधील अग्रलेख, पत्रकार परिषदा, ट्विट्स यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपाला सातत्यानं लक्ष्य केलं. यासोबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

Web Title: shiv sena mp sanjay raut indirectly hits out at bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.