शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 13:11 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांची टोलेबाजी; फडणवीस आणि पाटील यांचा समाचार

मुंबई: राज्य कोरोना संकट असतानाही राजकारण जोरात सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर सातत्यानं शरसंधान साधत आहेत. तर त्यांच्यी टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपावर सतत तोंडसुख घेणाऱ्या संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोरोना स्थितीवरही लेखन करावं, असा सल्ला देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला. आता राऊत यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामनाचे निष्ठावंत वाचक आहेत. सामना वाचल्यानं ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामना वाचतात. त्यामुळेच त्यांच्या बुद्धीला आणि मनाला चालना मिळते. सामना वाचत असल्यानं ते मुख्य प्रवाहात येत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन,' अशी टोलेबाजी राऊत यांनी केली. सामनामध्ये कोरोनावर लिखाण करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीस यांना राऊत यांनी उत्तर दिलं. फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमधील सामना नीट वाचवा. त्यांना कोरोनावरील लिखाण वाचायला मिळेल, असं राऊत म्हणाले. सामनामध्ये उद्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो राऊत यांनी ट्विटरवर 'एक शरद सगळे गारद' अशा शीर्षकासह शेअर केला. त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेलादेखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी खूप वर्षांपूर्वी मार्मिकमध्ये एक लेख लिहिला होता. दोन शरद, सगळे गारद असं त्याचं शीर्षक होतं. शरद जोशी आणि शरद पवार यांच्यावर तो लेख लिहिण्यात आला होता. तेव्हा विरोधी पक्षनेते बहुधा राजकारणातसुद्धा नव्हते. मात्र आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो. राजकीय अभ्यासात पाया पक्का असावा लागतो,' असा चिमटा राऊत यांनी फडणवीस यांना काढला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवार