शिवसेनेच्या आमदाराने लावला नेम; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळून जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 07:01 PM2020-06-15T19:01:53+5:302020-06-15T19:03:48+5:30

सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले.  हे नांदेडचे बालाजी कल्याणकर यांच्या बाबतही घडले़ सध्या ते नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत.

Shiv Sena MLA Balaji Kalyankar play with the children in Nanded | शिवसेनेच्या आमदाराने लावला नेम; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळून जिंकलं मन

शिवसेनेच्या आमदाराने लावला नेम; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळून जिंकलं मन

googlenewsNext

नांदेड : भोळाभाबडा आणि सहज उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी म्हणून ख्याती असलेल्या आमदार बालाजी कल्याणकर यांनी बच्चेकंपनीसमोर गोट्यांचा डाव खेळून त्यांच्या मनावरही अधिराज्य निर्माण केले.   

सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले.  हे नांदेडचे बालाजी कल्याणकर यांच्या बाबतही घडले़ सध्या ते नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा स्वभाव, काम करण्याची धडपड व तत्परतेने नेता बनविले. पण; त्यांच्यातील कार्यकर्तेपण कधीही संपले नाही. यामुळेच आमदार असूनही काम करण्याची पद्धती त्यांची कधीही बदलू शकली नाही. खेडेपाडयात जाणे, गावकर्‍यांच्या समस्या ऐकणे, शक्य होईल तितके सोडविणे हा त्यांचा मुळ स्वभाव राहिला आहे. 



लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मजूर यांच्या अडीअडचणीसाठी २४ तास सेवा देणाऱ्या या अवलिया आमदाराने चक्क गोट्यांचा डाव खेळत बच्चेकंपनीमध्येही आघाडी मिळविली.  मतदारसंघातील सुगाव येथे गेले असता लहान मुले गोट्या खेळत होती़ यावेळी आ. क़ल्याणकर यांनाही लहानपण आठवले आणि त्यांनी बिनधास्तपणे गोट्यांच्या डावामध्ये सहभाग घेत निशाना लावला.

Web Title: Shiv Sena MLA Balaji Kalyankar play with the children in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.