शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 09:56 IST

तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी, ममता बॅनर्जींचा आदित्य ठाकरेंना सल्ला; राऊत यांची माहिती.

नुकताच ममता बॅनर्जी (Mamata Banergee) यांनी मुंबईचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली होती. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट होऊ शकली नाही. परंतु या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांची भेट घेत ममता बॅनर्जी यांनी एक मागणी आणि विनंतीही केली. या भेटीदरम्यानचा एक किस्सा संजय राऊत यांनी सांगितला. ‘‘प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे ‘बंगाल भवन’ उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल. अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली,’’ अशी माहिती संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केली. ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे, असेही ते म्हणाले.आदित्य ठाकरेंचं कौतुक‘‘तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगले काम तुम्ही करताय. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाणघेवाण वाढायला हवी. प. बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात,’’ असं म्हणत ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकारणाची सूत्रं हाती घ्या"आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे!’’ असेही त्या म्हणाल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीShiv Senaशिवसेना