शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

काका होणार मुख्यमंत्री... पुतण्याची सक्रिय राजकारणात एन्ट्री; ठाकरे कुटुंबासाठी मोठा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 1:30 PM

काका-पुतण्याच्या नवा वाटचालीला आजपासून सुरुवात

मुंबई/नवी मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्याचं नेतृत्त्व करणारे ते पहिले ठाकरे ठरणार आहेत. तर आदित्य यांच्या रुपात यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली. त्यानंतर आज उद्धव मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यानं आजचा दिवस ठाकरे कुटुंबासाठी ऐतिहासिक आहे. यासोबतच ठाकरे कुटुंबासाठी आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आज पहिल्यांदाच आंदोलनात उतरले. आंदोलनाचं नेतृत्व करत ते पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय झाले.आज ठाकरे कुटुंबातील काका-पुतण्यानं नव्या वाटचालीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याआधी १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार होतं. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारमध्ये नव्हती. सत्तेत न जाता सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवायचं धोरण ठाकरे कुटुंबानं स्वीकारलं. मात्र आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना उद्धव यांनी सरकारमध्ये जात थेट मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे पुतणे आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी मनसेनं थाळीनाद आंदोलन केलं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे