‘तिने’ स्वत:च चाकू भोसकून घेतला

By Admin | Updated: July 26, 2015 01:59 IST2015-07-26T01:59:20+5:302015-07-26T01:59:20+5:30

विरार पूर्व भागातील नाना-नानी पार्क येथील मानसी घाणेकर ही सकाळी शाळेत जात असताना अज्ञात इसमाने तिच्यावर चाकूचा हल्ला करून तिला जखमी केल्याच्या घटनेने संपूर्ण

She 'tucked' herself with a knife | ‘तिने’ स्वत:च चाकू भोसकून घेतला

‘तिने’ स्वत:च चाकू भोसकून घेतला

पारोळ : विरार पूर्व भागातील नाना-नानी पार्क येथील मानसी घाणेकर ही सकाळी शाळेत जात असताना अज्ञात इसमाने तिच्यावर चाकूचा हल्ला करून तिला जखमी केल्याच्या घटनेने संपूर्ण विरार परिसरात खळबळ माजली होती. अनेक संघटनांनी त्या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. पण, त्या मुलीने स्वत:च चाकू विकत घेऊन स्वत:च पोटात मारून एका अनोळखी तरुणाने तिच्या पोटात चाकूचा वार केल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीला पकडण्यासाठी ५ पोलीस अधिकारी आणि २० पोलीस कर्मचारी यांची ५ तपास पथके तयार करून पीडित मुलीच्या राहण्याचा परिसर, शाळेचा परिसर आणि जाण्यायेण्याच्या परिसरात तपास करण्यात आला. पोलिसांनी काही संशयितांकडेही चौकशी केली. अधिक तपास केला असता या प्रकरणातील साक्षीदाराकडे केलेली चौकशी आणि मिळविलेल्या पुराव्यामध्ये सदर पीडित मुलीनेच तिचे प्रेमप्रकरण तिच्या वडिलांना समजू नये म्हणून चाकूने स्वत:वरच हल्ला केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Web Title: She 'tucked' herself with a knife