शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 06:25 IST

जे बनायचे ते स्वतःच्या बळावर. दुसर्‍याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे : भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेशरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले. पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या १० वाक्यांचे जाहीर वाचन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने अवघ्या ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली. 

‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करत फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ‘वज्रमूठबद्दल काय बोलणार? वज्रमूठचा निर्माता असलेले शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात वज्रमूठचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा, असे सांगून फडणवीस यांनी त्या पुस्तकातील १० वाक्येच वाचून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘पवार म्हणाले, तेच आम्ही म्हणत होतो, तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले.’    ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या ८ मागण्याही फडणवीस यांनी वाचून दाखवल्या, प्रत्येक मागणीनंतर ते न्यायालयाने हे मान्य केले का, असा प्रश्न विचारून प्रेक्षागृहातील भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नाही’ सामूहिकपणे म्हणून घेत होते. हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पुन्हा निवडून येईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.  

ठाकरेंनी पवारांचा क्लास लावावा मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे. टीआरपी कसा खेचावा यासाठी पवारांचा क्लास लावावा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.  

एक भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा, तिसरा हिसकावणारा.... मविआची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. मविआतील एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी हिसकावणारा, अशी कोटीही फडणवीस यांनी यावेळी केली.

जे बनायचे ते स्वतःच्या बळावर. दुसर्‍याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे- बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती.- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु, ऑनलाइन पद्धतीने.- दुसरीकडे राजेश टोपे, अजित पवार आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.- उद्धव ठाकरेंचे फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना