युतीतुटीवर शरद पवारांची गुगली

By Admin | Updated: January 26, 2017 22:38 IST2017-01-26T22:38:34+5:302017-01-26T22:38:34+5:30

युतीतुटीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय पटावर तिरकी चाल खेळली आहे

Sharad Pawar's googly on Yutituti | युतीतुटीवर शरद पवारांची गुगली

युतीतुटीवर शरद पवारांची गुगली

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 26 -  यापुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. तर या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय पटावर तिरकी चाल खेळली आहे. 
 दीर्घकाळापासून असलेली शिवसेना-भाजपातील युती तुटल्याचे मला  अतीव दु:ख झाले आहे. अशी कोपरखळी मारली. तसेच जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर भाजपाला पाठिंबा देणार का असे विचारले असता, "मी जर तरच्या प्रश्नांना मी उत्तरं देत नाही. त्यांचा एकदा निर्णय झाला की त्यांनी चर्चेला यावे," असे पवार यांनी सांगितले.  पवार यांच्या या टिप्पणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नव्याच चर्चेला तोंड फुटले आहे.  

Web Title: Sharad Pawar's googly on Yutituti