शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील सुताचे टॉवेल लंडनच्या मॉलमध्ये

By admin | Updated: January 18, 2015 01:10 IST

महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या कपड्यांनी सातासमुद्रापार झेप घेतली आहे.

रमाकांत पाटील - नंदुरबारमहाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या कपड्यांनी सातासमुद्रापार झेप घेतली आहे. सूतगिरणीच्या ‘टेरीटॉवेल’ला (टर्कीश टॉवेल) लंडनच्या मॉलमध्ये पसंती मिळत असून, निर्यातीतून पहिल्या दोन महिन्यांतच सूतगिरणीला २ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या उत्तम दर्जाच्या सुताच्या धाग्याने युरोपातील देशांनाही भुरळ घातली आहे. गेल्या १० वर्षांपासून चीन, बांगलादेश, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को आदी १५पेक्षाही अधिक देशांमध्ये धाग्याची निर्यात होत आहे. परिणामी, सूतगिरणीनेही उत्पादन क्षमता वाढविली आहे. सध्या रोज ४० हजार किलो सूत येथे तयार होते. मात्र केवळ सूत विक्रीवरच न थांबता त्यापासून रेडीमेड कपडे तयार करण्यासाठी सूतगिरणीने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू असून, त्याला अपेक्षेहून अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्यात होणाऱ्या टॉवेलची भारतीय बाजारपेठेतील किंमत प्रतिनग साधारणत: ७०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे. ‘पाच एफ’ अर्थात फार्म, फार्मर, फायबर, फॅब्रिक्स आणि फॅशन असा सूतगिरणीचा कार्यसंकल्प आहे. पी.के. अण्णा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे हा टप्पा गाठता आला. शेतकऱ्यांच्या कापसाला जास्तीतजास्त भाव देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला. त्याला प्राथमिक स्तरावर यश मिळाल्याने आता पुढच्या टप्प्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. या गारमेंटचा ‘लोकस्पीन’ या नावाने ब्रॅण्ड तयार करण्यात येणार आहे. - दीपक पुरुषोत्तम पाटील, अध्यक्ष, जयप्रकाश सूतगिरणीसूतगिरणीतर्फे सध्या टी शर्ट, टॉवेल, बेडशिट, पांढरे कापड यासह इतर तयार कपडे बनविले जात आहेत. त्यांच्या विक्रीसाठी शहाद्यात स्वतंत्र शोरुमही तयार केले आहे.