भावना भार्गवे यांचे निधन

By Admin | Updated: June 2, 2015 02:02 IST2015-06-02T02:02:09+5:302015-06-02T02:02:09+5:30

येथील ज्येष्ठ लेखिका, व्यासंगी अभ्यासक, अध्यापक तथा शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अग्रणी भावना भार्गवे (८४) यांचे सोमवारी पहाटे दोनच्या

Sense Bhargava passed away | भावना भार्गवे यांचे निधन

भावना भार्गवे यांचे निधन

नाशिक : येथील ज्येष्ठ लेखिका, व्यासंगी अभ्यासक, अध्यापक तथा शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अग्रणी भावना भार्गवे (८४) यांचे सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दत्तात्रय, मुलगा प्रमोद, सून ललिता, मुली वर्षा ओक व प्रा. डॉ. वृंदा भार्गवे असा परिवार आहे.
रविवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती. भावना भार्गवे यांनी एमए. एमएड्पर्यंत शिक्षण घेतले होते. १९५३ ते १९८९ अशी सुमारे ३६ वर्षे त्या शिक्षण खात्यातील विविध पदांवर कार्यरत होत्या. १९८९ मध्ये त्या नाशिकच्या शासकीय माध्यमिक कन्या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. नोकरीनिमित्त ठाणे, पुणे, औरंगाबाद व नाशिक असा प्रवास झाला.

Web Title: Sense Bhargava passed away