भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

By Admin | Updated: May 31, 2014 22:40 IST2014-05-31T20:12:00+5:302014-05-31T22:40:34+5:30

एका गोडावूनमध्ये साठवून करुन ठेवलेला ४ लाख ७० हजारांचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त करून ललीत चौधरी (३५) याला अटक केली

Seized Rs 5 lakh worth of gutkha from Bhiwandi One arrested | भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

ठाणे- अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी, पूर्णा येथील एका गोडावूनमध्ये साठवून करुन ठेवलेला ४ लाख ७० हजारांचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त करून ललीत चौधरी (३५) याला अटक केली असून अहमदबाद येथील रोहीत पटेल (४५) हा फरार झाल्याने त्याचा शोध सुरु केला आहे. ही कारवाई सह-आयुक्त (प्रभारी) प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सिरोशिया यांच्या पथकाने केली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Seized Rs 5 lakh worth of gutkha from Bhiwandi One arrested