सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ, लोकमंगलची बँक खाती गोठवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:15 IST2019-01-04T16:13:03+5:302019-01-04T16:15:17+5:30
महाराष्ट्र सरकारमध्ये सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांना सेबीने जबरदस्त दणका दिला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ, लोकमंगलची बँक खाती गोठवण्याचे आदेश
ठळक मुद्देसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ लोकमंगल संस्थेची बँक खाती गोठवण्याचे सेबीचे आदेश गुंतवणुकदारांचे 75 कोटी परत न केल्याने बँक खाती गोठवण्याचे आदेश
मुंबई - महाराष्ट्र सरकारमध्ये सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांना सेबीने जबरदस्त दणका दिला आहे. गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत न केल्याने देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची होण्याची शक्यता आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल समुहाने गुंतवणुकदारांकडून घेतलेले 75 कोटी रुपये तीन महिन्यांत परत करावेत, असे आदेश सेबीने दिले होते. मात्र हे पैसे विहीत कालावधीत परत करण्यात न आल्याने अखेर सेबीने लोकमंगल समुहावर कारवाई केली आहे.