शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अधिसूचनेवरून गदारोळ

By admin | Updated: April 6, 2015 23:23 IST

शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या

मुंबई : शासनाने १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादनाबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून सोमवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सातवेळा कामकाज तहकूब झाले व त्यानंतर दिवसभराकरिता बंद करण्यात आले. या अधिसूचनेला शिवसेनेचाही विरोध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.राज्य शासनाने भूसंपादनाची अधिसूचना काढल्याबाबत सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याचा प्रस्ताव हेमंत टकले यांनी मांडला. त्याला शेकापच्या जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अशी अधिसूचना काढण्याचा सरकारला अधिकार नाही तसेच अधिसूचना काढण्यापूर्वी सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते हे दोन आक्षेप विरोधकांनी घेतले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा वटहुकूम नसून अधिसूचना आहे व सरकारला ती काढण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारने अजून याबाबतचा कायदा केलेला नसल्याने सभागृहाला विश्वासात घेतले नाही, असे तावडे यांनी सरकारच्यावतीने सांगितले. मात्र विरोधकांचे या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी वेलमध्ये उतरून ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत कागदाचे कपटे हवेत भिरकावले तसेच सचिवांच्या समोरील टेबल वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारच्या या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, अशी भीती वाटते असल्याने यावर चर्चा झाली पाहिजे. उपसभापती डावखरे यांनी या विषयावर कधी चर्चा करायची ते सभापतींशी बोलून ठरवण्यात येईल, असे सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री तावडे यांनी या विषयावर चर्चा व्हावी ही आमचीच इच्छा असून आम्हाला यांना उघडे पाडायचे आहे. शेतकऱ्यांना कोण लुटत आहे ते जनतेला कळलेच पाहिजे, असे तावडे म्हणाले. सरकारला अधिवेशन काळात अधिसूचना काढता येते किंवा कसे याबाबतचे मार्गदर्शन सभापतींनी करावे, अशी मागणी तावडे यांनी केली. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या भूसंपादन अधिसूचनेला शिवसेनेचा विरोध आहे. या विषयावर आम्ही यापूर्वीच मतभेद व्यक्त केले असून त्यावर चर्चा करायला हवी. गोऱ्हे यांच्या या विधानावर विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. सातवेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर अखेर दिवसभराकरिता बंद झाले. (विशेष प्रतिनिधी)