शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’

By admin | Updated: June 19, 2014 22:07 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. सामान्य कुटुंबातील शेकडो रुग्णांचे किरकोळ आजार शस्त्रक्रियेअभावी गंभीर रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने ठरवून दिलेल्या निकषानुसार येथे असलेल्या सुविधा व जागा अपुरी पडत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वॉर्डांमध्ये शिकवणी वर्ग दाखवून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. या वॉर्डातील रुग्णांना व्हरांड्यात ठेवण्यात आले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया विभागाचीही तीच परिस्थिती असून, त्यामुळे हा विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांना मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागणार आहे. शस्त्रक्रिया विभाग नावापुरता सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रुग्णांविषयी कुठलाही कळवळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.** रुग्णांना पाण्यात झोपावे लागणार..पावसाळय़ाच्या तोंडावर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना ब्लड बँकेसमोरील पॅसेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या जागेत पावसाळय़ाचे पाणी घुसणार असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात पाण्यामध्ये झोपावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.** शस्त्रक्रिया विभागातील वास्तवशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र ज्या रुग्णांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ आजारी रुग्णांचे आजार वाढत असून, त्यांना चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ** या शस्त्रक्रिया रखडल्याशरीरावर गाठ असल्यास ती शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक आहे, मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याने ही गाठ वाढून रुग्णांना मोठा आजार होण्याचा धोका होत आहे. अँपेंडिक्स, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. ** बांधकामाच्या नावाखाली रुग्णांची हकालपट्टीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील काही वॉर्डांचे बांधकाम व देखाभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने रुग्णांची सरळ-सरळ हकालपट्टी करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.