शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनींवरही शाळा, इस्पितळांची उभारणी

By admin | Updated: June 12, 2015 03:57 IST

शेतजमिनी किंवा ना विकास क्षेत्रावर शैक्षणिक संस्था किंवा इस्पितळांची उभारणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे

यदु जोशी, मुंबईशेतजमिनी किंवा ना विकास क्षेत्रावर शैक्षणिक संस्था किंवा इस्पितळांची उभारणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक व आरोग्य सुविधा उभारणीतील विलंब आणि अडथळे दूर झाले आहेत. आधी शेतजमिनी (कृषक) जमीन अकृषक केल्यानंतरच अशा प्रकारची परवानगी दिली जात असे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने ते जास्तीत जास्त तीन-तीन वर्षे वा कधीतर त्याहूनही अधिक अवधी लागायचा. त्यातून प्रकल्पाची किंमत वाढायची. तसेच अनेकदा ‘अर्थपूर्ण’ व्यवहारही होत असत. या सर्व दिरंगाईला आणि खाबूगिरीला चाप लावणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शेतजमिनीवर निव्वळ भूखंड क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्रातच बांधकामाची परवानगी देत आणि वृक्षारोपणाची अट ठेवत या परिसरात सिमेंटचे जंगल उभारले जाणार नाही, याची दक्षताही घेण्यात आली आहे. नगरविकास विभागाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, कृषक वा ना विकास क्षेत्रातील एकूण जमिनीच्या एक पंचमांश जागेवर तळमजला आणि वर एक मजला एवढे बांधकाम करण्याची परवानगी असेल. तसेच विशिष्ट जमिनीवर वृक्षारोपण करणे अनिवार्य असेल. या शिवाय, जादा चटई क्षेत्राची (एफएसआय) आॅफर देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी प्रीमियम भरावा लागेल. अकृषक क्षमता जमीन दराच्या (नॉन अ‍ॅग्रीकल्चर पोटेन्शियल लँड रेट) ३० टक्के रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागेल. जिथे असे दर उपलब्ध नसतील तिथे त्यावर्षी नोंदणी महानिरीक्षकांच्या वार्षिक अहवालात (एएसआर) नमूद केलेल्या दराच्या ३० टक्के रक्कम ही प्रीमियम म्हणून भरावी लागेल. नर्सरी किंवा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेसाठी इमारत उभारली जाणार असेल तर त्या एकाच इमारतीत असाव्यात, यासाठी तळमजला अधिक दोन मजले (जी प्लस टू) बांधण्याची परवानगी असेल.