शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

देशी कपाशी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!

By admin | Updated: January 27, 2015 23:47 IST

शेतक-यांचा देशी कापूस वाणांच्या पेरणीकडे कल.

अकोला: राज्यातील कापूस उत्पादक प्रदेशांमधील शेतकर्‍यांचा कपाशीच्या देशी वाणांच्या पेरणीकडे कल वाढत आहे; पण यावर्षी खरीप हंगामादरम्यान अल्प पावसाचा फटका बसल्याने, पुढील हंगामात देशी कापूस वाणांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे.काही वर्षांपूर्वी देशात कपाशीच्या बीटी बियाण्यांनी बाजारपेठ काबीज केली. अलीकडे मात्र पुन्हा एकदा कपाशीच्या देशी वाणांच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, बाजारात या बियाण्यांना मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कापसाचे सात वाण विकसित केले आहेत. सध्या या कृषी विद्यापीठाने उच्च घनता कापूस वाणांवर लक्ष केंद्रित केले असून, पावसाचा ताण सहन करू शकणार्‍या व कमी दिवसांत येणार्‍या वाणांचा त्यामध्ये समावेश आहे. या वाणांच्या बियाण्याची लागवड केल्यास, बीटी कपाशीच्या तोडीस तोड उत्पादन मिळत असून, पीक काढल्यांनतर रब्बी हंगामातील पीकही घेता येते.यावर्षी खरीप हंगामात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकूण १५0 हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादनासाठी कपाशीच्या देशी वाणाची पेरणी केली; पण पावसाला जुलैनंतर सुरुवात झाली आणि नंतरही पावसाचा मोठा खंड पडल्याने, पिकाला फटका बसला. त्यामुळे यावर्षी देशी वाणाच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दीडशे हेक्टर क्षेत्रावर देशी वाण बिजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. त्याला अल्प पावसाचा फटका बसल्याने, येत्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठाच्या या कापूस वाणांचा तुटवडा काही प्रमाणात जाणवणार असल्याचे कृषीविद्यापीठाच्या बियाणे विभागाचे उप-संचालक डॉ. डी. टी. देशमुख यांनी स्पष्ट केले. *हे आहेत देशी वाण..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एके-५, एके-७, एके-८, तसेच पीकेव्ही रजत, एकेएच-८८२८ आणि उच्च घनता एकेएच-0८१ हे देशी वाण विकसित केले आहेत. त्यांना मागणीही उत्तम आहे.