शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या फोटो खरेदीत घोटाळा

By admin | Updated: October 9, 2015 02:39 IST

शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सरकारी छापखान्यात केवळ ११ रुपये प्रतिनग मिळणारी छायाचित्रे राष्ट्रीय

मुंबई : शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सरकारी छापखान्यात केवळ ११ रुपये प्रतिनग मिळणारी छायाचित्रे राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून १३५० रुपये प्रतिनग या प्रचंड दराने खरेदी करण्यात आली असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांना विकून पैसे खाण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी तावडेंवर १०६ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत घोटाळा झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एकूण १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून, यात महापुरुषांचे छायाचित्र खरेदीत १२ कोटी व पुस्तक खरेदी ९४ कोटींचा समावेश आहे. राज्य शासनाच्या छापखान्यात प्रतिनग ११ रुपये दराने महापुरुषांची छायाचित्रे दिली जातात. मात्र, तावडेंच्या खात्याने सरकारी छापखान्याऐवजी राष्ट्रीय छापखान्यातून १३५० इतक्या चढ्या दराने महापुरुषांची छायाचित्रे घेतली. या महागड्या छायाचित्रांच्या खरेदीतून तावडेंनी ११ कोटी रुपये खाल्ले आहेत. तसेच गुजरातच्या एका कंपनीकडून ९४ कोटी रुपयांची पुस्तक खरेदी केली. विशेष म्हणजे ३१ मार्च २०१५ रोजी पुस्तक खरेदीचा आदेश काढण्यात आला आणि सर्व शाळांमध्ये पुस्तके पोहोचविण्याची अंतिम मुदतही ३१ मार्चच ठेवण्यात आली. या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला. चिक्की प्रकरणात मंत्र्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे छायाचित्र खरेदी घोटाळ्याची कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्टअंतर्गत चौकशी समिती नेमून न्यायीक चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. केंद्राच्या आदेशानुसारकेंद्र सरकारच्या आदेशानुसार ही सर्व खरेदी झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचाही हात असण्याची शक्यता असल्याचे मलिक म्हणाले.