शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गिनीज बुकमध्ये सातारा हिल हाफ मॅरेथॉन

By admin | Updated: September 7, 2015 01:17 IST

साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे

सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. ‘डोंगरावरील धावण्यात सर्वाधिक लोक-एक डोंगर’ यासाठी ही नोंद केली आहे. गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. सातारा पोलीस कवायत मैदान ते यवतेश्वर पठार व पुन्हा पोलीस कवायत मैदान या २१ किलोमीटर अंतराच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये ५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहाटे ६ वाजता पोलीस कवायत मैदानावरून स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंसह १० वर्षांपासून ते ९६वर्षीय ज्येष्ठ नागरिकानेही सहभाग घेतला होता.या स्पर्धेत इथिओपिया देशातील खेळाडूंनी विजेतेपद मिळविले. यामध्ये बिर्क जिटर, टॅमरट गुडेटा आणि गुडिसा डेबेले विजेते ठरले. त्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुभाषीश आचार्य, डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.स्पर्धा पूर्ण केल्यानंतर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते मॅरेथॉन संयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी) गुजरातच्या स्पर्धेला सोडले मागेसातारा हिल हाफ मॅरेथॉनने गुजरातमधील स्पर्धेला मागे टाकले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत २,१२२ स्पर्धक सहभागी झाले होते, तर सातारा येथील स्पर्धेत तब्बल ५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली. सातारा येथील हिल मॅरेथॉन ही अवघड होती, अशा शब्दांत गिनीजने या स्पर्धेचे कौतुक केले आहे.ही होती प्रमुख अटसहभागी प्रत्येक खेळाडूने कमीतकमी १ हजार फूट धावणे बंधनकारक होते. मात्र, सर्वसाधारणपणे बाराशेहून अधिक फूट धावल्याची नोंद झाली. सातारा येथे रविवारी झालेल्या ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत ५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते मॅरेथॉन असोसिएशन संयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नॉरी विल्यमसन, चंद्रशेखर घोरपडे, संदीप काटे, प्रतापराव गोळे, अ‍ॅड. कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.