‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

By Admin | Updated: September 8, 2015 00:54 IST2015-09-08T00:54:17+5:302015-09-08T00:54:17+5:30

शिक्षक दिनी यंदा ‘गुगल इंडिया’कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी चार शिक्षकांची दखल घेण्यात आली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील प्रा. दीपक ताटपुजे तसेच

Satara teachers' honor from Google | ‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

सातारा : शिक्षक दिनी यंदा ‘गुगल इंडिया’कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी चार शिक्षकांची दखल घेण्यात आली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील प्रा. दीपक ताटपुजे तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव या दोन शिक्षकांचा समावेश आहे.
सातारा येथील प्रा. दीपक ताटपुजे हे गेल्या ३० वर्षांपासून सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील दीडशे शिक्षकांना ‘आॅनलाइन’ शिक्षण प्रणाली कशी वापरावी, याचे प्रशिक्षण दिले आहे.
म्हसवड येथील बालाजी जाधव हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी संगणक क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना शिक्षणक्षेत्राला वाहिलेले संकेतस्थळ तयार केले आहे.
तसेच दुसरी व चौथीच्या अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकाशिवाय शिकविता यावे, यासाठी अ‍ॅप्स तयार केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satara teachers' honor from Google