शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

ससून डॉक बंदचा इशारा

By admin | Updated: March 16, 2015 02:55 IST

‘महाराष्ट्र राज्य फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने ससून डॉकमधील हजारो पुरवठादार आणि मासळी व्यापाऱ्यांकडून १९८४पासून भाड्यापोटी जमा केलेली

उरण : ‘महाराष्ट्र राज्य फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने ससून डॉकमधील हजारो पुरवठादार आणि मासळी व्यापाऱ्यांकडून १९८४पासून भाड्यापोटी जमा केलेली सुमारे २५ कोटींची रक्कम बीपीटीकडे जमाच केलेली नाही. त्यामुळे ससून डॉक बंदरात बीपीटीच्या मालकीची असलेली आणि फिशरिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सप्लायर्स, मासळी व्यापाऱ्यांना भाड्याने दिलेली ६० गोडाऊन एप्रिलपासून बीपीटीच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे मासळी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याची वेळ सप्लायर्स आणि मासळी व्यापाऱ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यातील सप्लायर्स आणि मासळी व्यापारी १७ मार्चपासून बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा ससून डॉक मासेमारी बंदर बचाव कृती समितीने केंद्र, राज्य सरकारला दिला आहे. राज्यातील मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मच्छीमारीचा व्यवसाय चालतो. त्यातून दरवर्षी कोट्यवधींचे परकीय चलनही मिळते. या पाचही जिल्ह्यांतील मच्छीमारांना एकमेव ससून डॉकचा आधार आहे. हे बंदर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्याची मालकी बीपीटीकडे आहे. तेथील ६० गोडाऊन्स १९८४ साली भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्यासाठी पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत मासिक भाडे आकारले आहे. पोटभाडेकरू म्हणून असलेल्या सप्लायर्स आणि व्यापाऱ्यांनी भाडे नियमितपणे महाराष्ट्र राज्य फिशरिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे जमा केली आहे. फिशरिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने २५ कोटींचा बीपीटीकडे भरणाच केलेला नाही. भाड्याची रक्कम व्याजासकट तत्काळ जमा करावी, अथवा गोडाऊन्स रिकामी करावीत, अशी तंबीच महाराष्ट्र राज्य फिशरिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन देण्यात आली होती. मात्र कॉर्पोरेशनने बीपीटीच्या मागणीला उत्तर न दिल्याने बीपीटीने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने बीपीटीच्या बाजूने निकाल दिला होता. दंड आणि व्याजासह भाड्याची रक्कम जमा करून भाड्याची जागा मोकळी करून देण्याचे आदेश १६ आॅक्टोबर २०१४ रोजी दिले आहेत. यासाठी दिलेली १६ एप्रिलपर्यंतची मुदत संपत आली आहे. (वार्ताहर)