शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:23 IST

"कालचे राज ठाकरे यांचे भाषण आपण सत्यवचनी म्हणतो, तसे भाषण झाले. आमचेही तेच मत आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे..."

आता फोडाफोडीचे राजकारण राहिले नाही, आता पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचे हे पहिल्यांदाच बघितले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदे यांची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, असे विधान राज ठाकरे यांनी डोंबिवलीत राजू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले होते. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संयज शिरसाट यांनी भाष्य केले आहे. कालचे राज ठाकरे यांचे भाषण आपण सत्यवचनी म्हणतो, तसे भाषण झाले. आमचेही तेच मत आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

आमदार शिरसाट म्हणाले, "काल राज ठाकरे यांनी जे भाषण केले, ते अत्यंत सत्यवचनी म्हणतो आपण, तसे भाषण झाले आहे. आमचेही तेच मत आहे. ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची आहे, हा धनुष्य-बाण शिवसेना प्रमुखांचा, हिंदुत्वाचा विचार हा शिवसेना प्रमुखांचा आणि आम्ही केवळ तो पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे एक पाईक आहोत. शिवसेने आमची नाहीच, शिवसेना शिवसेना प्रमुखांची आहे. म्हणून राज ठाकरे जे काही बोलले ते सत्य बोलले आहेत." 

मी ज्या पक्षात काम करतो, आम्ही ना पहिल्या दिवसांपासून शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले, ना शिवसेना प्रमुखांचा धनुष्य-बाण सोडलाय, ना आमच्या पैकी कुणीही, ही शिवसेना आमची आहे अथवा आम्ही निर्माण केली आहे, असे वक्तव्य कधीही कुठेही केलेले नाही. ही शिवसेने शिवसेना प्रमुखांचीच आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्ही या महाराष्ट्रात घौडदौड करत आहोत.

...हीच का लाडकी बहीण योजना? -मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय, हीच का लाडकी बहीण योजना? असा सवाल करत, राज यांनी आपल्या डोंबिवलीतील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, "आता भोजपुरी गाण्यावर नाचली की मराठी गाण्यावर नाचली, हा प्रांतवाद आता काढण्याची कसलीही आवश्यकता नाही. आम्हाला महाराष्ट्रात सर्व जाती धर्माची संस्कृती एका व्यासपीठावर आणायची आहे. काही लोक जेव्हा पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढतात, त्यावर टीका केली असती, तर ती अधिक सार्थक ठरली असती. मुसा नावाचा अतिरेकी, गँगस्टर आहे, तो त्या रॅलीत येतो, त्यावर टीका केली असती, तर बरे झाले असते. मला वाटते की, तो राष्ट्रीय मुद्दा असू शकतो. नाचणे...गाणे..., आता छटपूजेला आपणही जाता, आम्हीही जातो. म्हणून संस्कृती बदलली, अशातला भाग नाही. संस्कृती जपायचेही काम करायला हवे. मात्र देशाच्या मुळावर जे उठले आहेत ना, त्यांना विरोधकरणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे."

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेना