शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या संचालकपदी संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख

By admin | Updated: August 23, 2014 02:12 IST

अकोल्याचे संजय धोत्रे यांनी महाबीजच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मोठय़ा फरकाने विजय संपादन केला.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)च्या संचालक मंडळातील दोन पदांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व वल्लभराव देशमुख यांनी शुक्रवारी मोठय़ा फरकाने विजय संपादन केला. खा. धोत्रे व देशमुख यांनी सर्व अकराही फेर्‍यांमध्ये, मोठी आघाडी घेत विरोधकांना धूळ चारली. महाबीजच्या कृषी भागधारकांमधून, संचालक मंडळावर तीन वर्षांंच्या कालावधीकरिता, अकोला-विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र या दोन मतदारसंघातून संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. अकोला-विदर्भ मतदारसंघात, अकोला जिल्ह्यातून खा. संजय धोत्रे व प्रशांत गावंडे आणि अमरावती जिल्ह्यातील प्रताप भुयार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात खा. धोत्रे यांनी १0,४७५ मते मिळवित विजय संपादन केला. प्रशांत गावंडे यांना २,९७८ मते मिळाली. भुयार यांना अवघ्या ५0 मतांवर समाधान मानावे लागले, तर २८ मते अवैध ठरली. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून परभणीचे नंदकुमार भोसले, नांदेडचे राजेश्‍वर पावडे व बुलडाणा जिल्ह्यातील वल्लभराव देशमुख रिंगणात होते. या मतदारसंघामध्ये वल्लभराव देशमुख यांनी ९,१0४ मते मिळवित विजय प्राप्त केला. नंदकुमार भोसले यांना १,४१२ व राजेश्‍वर पावडे यांना ७४६ मते मिळाली, तर १३ मते अवैध ठरली. महाबीजचे एकूण ५३ हजार भागधारक आहेत. त्यापैकी अकोला-विदर्भ मतदारसंघातील १३,५३१ मतदारांनी, तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातील ११,२७५ मतदारांनी मतदान केले होते.