सांगली टपाल विभागाने पटकाविले देशात अव्वल स्थान; एका दिवसात तब्बल १ अब्जांचा उतरवला विमा, राज्यात पहिल्या ५ मध्ये कोणते जिल्हे...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:07 IST2026-02-05T19:05:48+5:302026-02-05T19:07:03+5:30

विमा सेवा वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘महा लॉगिन डे’ उपक्रम राबविण्यात आला

Sangli Postal Department tops the country; Insurance of Rs 1 billion in one day, which districts are in the top 5 in the state | सांगली टपाल विभागाने पटकाविले देशात अव्वल स्थान; एका दिवसात तब्बल १ अब्जांचा उतरवला विमा, राज्यात पहिल्या ५ मध्ये कोणते जिल्हे...वाचा

संग्रहित छाया

सांगली : भारतीय टपाल विभागाच्या डाक जीवन विम्याच्या १४२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सांगली टपाल विभागाने दि. २ रोजी विक्रमी कामगिरी केली. एका दिवसात ५,२०२ नागरिकांचा तब्बल १ अब्ज ६६ कोटी रुपयांचा विमा उतरवत ७ कोटी ४१ लाख ८३ हजार ५२१ रुपयांचा विक्रमी हप्ता भरणा करून सांगली विभागाने देशात प्रथम क्रमांक पटकावला.

टपाल विभागामार्फत शहरी भागातील कर्मचारी, व्यावसायिक व पदवीधरांसाठी डाक जीवन विमा (पीएलआय), तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण टपाल जीवन विमा योजना राबवली जाते. विमा सेवा वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘महा लॉगिन डे’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी नोंदवली.

या यशासाठी मागील काही दिवसांपासून सांगली विभाग तसेच त्या अंतर्गत येणारी सर्व मुख्य व उप टपाल कार्यालये आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न करत देशात सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशात सर्वाधिक विमा उतरवण्याचा व हप्ता भरणा करण्याचा मान सांगली विभागाने मिळवला. यामुळे महाराष्ट्र सर्कलने एकूण १६.९७ कोटी रुपयांचा हप्ता भरणा करत ८२०.१६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्याची कामगिरी साध्य केली.

राज्यात पहिल्या पाच टपाल विभागांची कामगिरी

विभाग / पॉलिसी संख्या / हप्ता भरणा / विमा रक्कम

  • सांगली / ५२०२ / ७४१८३५२१ / १६६१४३५०००
  • धुळे / १८९० / ७८७१३५० / ७०१३७५०००
  • पुणे / १५०७ / ८४५३९६२ / ६७९११००००
  • पंढरपूर / १३६१ / १४१५१३१५ / ६२९३१००००
  • रत्नागिरी / २७५८ / ११४३६१६० / ५९०४६००००


राज्यांची कामगिरी

राज्य / पॉलिसी संख्या / हप्ता भरणा / विमा रक्कम

  • महाराष्ट्र / २२२५१ / १६९६८२५३५ / ८२०१६४५०००
  • कर्नाटक / १३६२० / ९२५६७१५० / ५६३६०९५००६
  • तामिळनाडू / ९९२० / ६०५८७९५६ / ४२४५१३००००
  • ओरिसा / १६२०९ / २८७६६५२९ / ४१९५७८५०००
  • उत्तर प्रदेश / १२५३९ / ६६९६४१९७ / ४०४४९८५००६

टपाल विभागाच्या अन्य सेवेप्रमाणे १४२ वर्षांची परंपरा लाभलेल्या विमा सेवेवर जनतेचा तितकाच विश्वास आहे. जिल्ह्यातील जनतेने विक्रमी हप्ते भरून हा विश्वास अधिक दृढ केला आहे. याच विश्वासाच्या जोरावर सांगली टपाल विभागाने देशात अव्वल कामगिरी बजावली आहे. - अर्जुन इंगळे, प्रवर डाक अधीक्षक, सांगली डाक विभाग

Web Title : सांगली डाक विभाग बीमा में देश में शीर्ष पर; करोड़ रुपये एकत्रित

Web Summary : सांगली डाक विभाग ने एक ही दिन में ₹1.66 बिलियन बीमा प्रीमियम एकत्र कर राष्ट्रीय स्तर पर शीर्ष स्थान हासिल किया। महाराष्ट्र ₹820.16 मिलियन बीमा कवरेज के साथ राज्यों में अग्रणी रहा। सांगली, धुले, पुणे, पंढरपुर और रत्नागिरी महाराष्ट्र के डाक विभागों में शीर्ष पर रहे।

Web Title : Sangli Postal Division Tops Nation in Insurance; Crore Rupees Collected

Web Summary : Sangli Postal Division secured the top rank nationally by collecting ₹1.66 billion in insurance premiums in a single day. Maharashtra led states with ₹820.16 million insurance coverage. Sangli, Dhule, Pune, Pandharpur, and Ratnagiri topped Maharashtra's postal divisions.