शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’ची सीआयडी चौकशी

By admin | Updated: October 3, 2015 03:46 IST

‘सनातन’ने जन्मदात्यांपासून मुलगी हिरावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर येथील सनातनचे शहर, तालुक्यातील साधक

बारामती : ‘सनातन’ने जन्मदात्यांपासून मुलगी हिरावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर येथील सनातनचे शहर, तालुक्यातील साधक व केंद्रप्रमुख आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शहर पोलीस व सीआयडीने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सनातन’च्या बारामतीतील केंद्रप्रमुखाचा मोबाइल शुक्रवारी सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. २०११मध्ये बारामती शहर पोलिसांनी सनातनच्या आश्रमातील शीतल बेपत्ता असल्याची तक्रार घेणे आवश्यक होते. त्या वेळी ती सज्ञान आहे, त्यामुळे प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून पोलिसांनी आम्हाला घरी पाठवले होते, याचा पुनरुच्चार शुक्रवारी शीतलच्या आईने पोलिसांसमोर केला. मोक्ष साधनेसाठी मुलीला आमच्यापासून दूर नेऊन त्यांनी काय साधले, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शीतल सध्या पनवेल येथील आश्रमात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर सीआयडीने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. सनातनचा केंद्रप्रमुख बारामती एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरी करतोे. त्याच्या भिगवण रोड येथील दूध संघ वसाहतीजवळ असलेल्या फ्लॅटमधून सनातनचे कामकाज चालते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. केंद्र प्रमुखाचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला; मात्र दिवसभर तो ‘नॉट रिचेबल’ होता. बारामती शहर व परिसरातील मंदिरे, धार्मिक स्थळांमध्ये सनातनचे कामकाज चालते. त्यानुसार माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. संस्थेचे स्थानिक व बाहेरचे किती साधक आहेत, याचीही माहिती घेतली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.‘लोकमत’च्या बातमीमुळे पोलीस यंत्रणा शीतलच्या शोधासाठी कामाला लागली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. सनातनच्या आश्रमात शीतलला ४ वर्षांपूर्वी नेण्यात आले होते. दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर प्रचंड तणावात असलेल्या शीतलच्या आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ते घाबरलेले आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)