शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुमुक्तीला शाळांचा ‘सलाम’!

By admin | Updated: February 1, 2015 02:49 IST

राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

राकेश जोशी - नाशिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असतानाच आता आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी धूम्रपानासारख्या व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत़ १० ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ शाळकरी मुले व्यसनाकडे आकर्षित होत असतील, तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यासाठी मुंबईतील सलाम फाउंडेशनने मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये २००३ पासून तंबाखूमुक्तीसाठी अभियान हाती घेतले आहे़ त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असले तरी एकमेव संस्थेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ व्यसनमुक्ती मोहिमेंतर्गत शिक्षण विभागाशी चर्चा, विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि त्यानंतर व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी पोस्टर्स प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे प्रयत्न केले जात आहेत़ सद्य:स्थितीत शाळांच्या १०० यार्ड परिसरात असलेल्या पानटपऱ्यांसह अन्य ठिकाणी सहज उपलब्ध होणारी तंबाखू हे एकमेव कारण या प्रयत्नांना खीळ घालत आहे. त्यामुळे विविध शाळांतील विद्यार्थिनींनी अशा टपरीचालकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा उपक्रम राबविला़ तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा विकणार नाही, अशी शपथ घेतली. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत़ मात्र, तरीही अनेक शाळांभोवती पानटपऱ्या सुरुअसल्याचे दिसून येते़ शिवाय, एमडीसारख्या अंमली पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचे नुकतेच ठाणे परिसरात उघडकीस आले आहे़ राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून शाळा परिसर तंबाखू मुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे़