शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खोटारडा, जखमींना मदत न करताच पळला!

By admin | Updated: May 8, 2015 04:56 IST

अनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण

अमर मोहिते, मुंबईअनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण त्याने ती केली नाही व पळून गेला. यावरून त्याचे वर्तन काय आहे हे लक्षात येते, असा ठपका सत्र न्यायालयाने ठेवला आहे.हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावताना सत्र न्यायाधीश डी.डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानच्या खोटेपणाचे विस्तृत विश्लेषण २४० पानी निकालपत्रात केले आहे. निकालाची  प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. मुळात अपघात केला नव्हता तर सलमानने तेथे जमलेल्या जमावाला तसे सांगायला हवे होते. तसेच घटनास्थळी पोलीस येईपर्यंत त्याने तेथे थांबायला हवे होते. पण तो पळाला. पळण्याचे कारणच काय होते? एवढेच काय तर आपण काही गैर केले नसल्याचा सलमानचा दावा होता, मग त्याने घटना घडल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून अपघाताची तक्रार करायला हवी होती. त्याने तसेही केले नाही. असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे. आपण गाडी भरधाव वेगाने चालवत नव्हतो, असा दावा स्वत: सलमाननेच केला आहे; आणि गाडी भरधाव वेगात नसेल तर टायर फुटणे अशक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.महत्त्वाचे म्हणजे १३ वर्षांनंतर अशोक सिंगने न्यायालयात येऊन सांगितले की, मी गाडी चालवत होतो आणि सलमानचे वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरून मी हे आता न्यायालयाला सांगतो आहे, अशी पुष्टीही सिंगने जोडली. मात्र स्वत:च्या मुलाला पुढे करून खऱ्या आरोपीला पाठीशी घालण्याचे काम सलीम खान यांनी खरेच केले असावे, याबाबत शंका वाटते. तसेच ड्रायव्हरला वाचवणे सलमानलाही मान्य असावे हे विश्वासार्ह नाही. कारण अपघात झाल्यापासून सिंग हा सलमानच्या घरातच काम करतो आहे. अशा परिस्थितीत सिंग गाडी चालवत होता, हे १३ वर्षांत समोर न येणे अशक्य आहे, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.विशेष म्हणजे अपघातात एकाचा बळी गेला आहे ही बाब मला नंतर कळाली, असा दावा सलमानने केला. प्रत्यक्षात सिंग गाडी चालवत होता तर अपघातात एकाचे निधन झाले आहे हे सलमानला घटनास्थळीच तत्काळ कळाले असते, असे देखील न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सलमान कसा खोटारडा आहे स्पष्ट झाले आहे.सलमानचा गुन्हा सिद्ध होणे कठीण बाब होती. कारण यातील मुख्य साक्षीदार, त्याचा सुरक्षा रक्षक व पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे हा खटला सुरू असतानाच निधन झाले. मात्र न्यायालयाने पाटील याची साक्ष नि:संदेह खरी असल्याचा निर्वाळा दिला .