सलमानला डायरी बघण्याची परवानगी

By Admin | Updated: March 13, 2015 05:49 IST2015-03-13T05:18:27+5:302015-03-13T05:49:10+5:30

हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी अभिनेता सलमान खानला बघू देण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी सरकारी पक्षाला दिले़hit,run,,,

Salman has permission to look at the diary | सलमानला डायरी बघण्याची परवानगी

सलमानला डायरी बघण्याची परवानगी

मुंबई: हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी अभिनेता सलमान खानला बघू देण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी सरकारी पक्षाला दिले़
यासाठी सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी अर्ज केला होता़ पोलीस अधिकाऱ्यांची नोंद या डायरीत केली जाते़ त्यामुळे या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने झाला हे यातून स्पष्ट होईल, असा दावा अर्जात केला होता़ बचाव पक्षाला अशा प्रकारे डायरी दाखवता येत नाही़ तेव्हा हा अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली़ न्यायालयाने ती अमान्य केली. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयात पोलीस अधिकारी रवींद्र कदम यांची साक्ष नोंदवण्यात आली़ कदम यांनी सुरुवातीला याचा तपास केला होता़ ही घटना घडली, तेव्हा मी सलमानच्या घरी गेलो़ पण तो घरी नव्हता, असे कदम यांनी न्यायालयाला सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Salman has permission to look at the diary