शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, बदली करता का बदली

By admin | Updated: August 28, 2014 03:22 IST

आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे साहेब... निवडणुकीत कामाला येईल... अशी आर्जवे करीत मंत्रालय आणि जवळपासच्या बंगल्यांवर राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबईसाहेब, एवढी एक तरी बदली करा ना... आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे साहेब... निवडणुकीत कामाला येईल... अशी आर्जवे करीत मंत्रालय आणि जवळपासच्या बंगल्यांवर राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, हे लक्षात घेऊन प्रत्येक मंत्र्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत आपली फाइल मंजूर करून घेण्यासाठी सगळे जण या विभागातून त्या विभागात अक्षरश: पळत सुटल्याचे चित्र आज दिवसभर होते.एक आमदार तावातावाने गृह विभागातील एका अधिकाऱ्याशी हुज्जत घालत होता. किती दिवस लावणार आहात, फाइल अजून का मंजूर झाली नाही, कुठे अडकलीय आमची फाईल... त्यावर शांतपणे तो अधिकारी सांगत होता, की साहेब, तुमची फाइल गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून आली की लगेचच सही घेऊन देतो. त्यावर तो आमदार तावातावाने म्हणाला, मंत्र्यांनी सांगून देखील सचिव ऐकत नाहीत का? मंत्री मोठे आहेत की सचिव? समोरचा अधिकारी निरुत्तर होता. दुसरे दृश्य राष्ट्रवादी भवनातले. तेथे इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. तेथे असणारे मंत्री काही कारणासाठी थोडावेळ जरी बाहेर आले तरी लगेचच अधिकारी, कार्यकर्ते त्यांना गाठून साहेब, आमच्या बदलीचं तेवढं सांगा... फार कामाचा माणूस आहे साहेब तो... अशी गळ घालताना दिसत होते. प्रत्येक विभागात आमदार, नेते, कार्यकर्ते बदलीसाठी फिरतानाचे चित्र मंत्रालय परिसरात आहे. याशिवाय कोणाला आपल्या मतदारसंघातील कामासाठी मंजूर झालेला निधी हवा आहे, तर कोणाला निधी मिळाला तरी अधिकारी फाइलच पुढे पाठवत नाहीत, अशाही तक्रारी होत्या. एका अधिकाऱ्याकडील दृश्य बोलके होते. एक कार्यकर्ता कम नेता त्या अधिकाऱ्याकडे आला. म्हणाला, साहेब, माझ्यासोबत गावाकडचा एक अधिकारी आला आहे. त्याला बोलवा. मी त्याच्या कामाबद्दल पाठपुरावा करतोय, लवकरच करतो असे त्याला सांगा म्हणजे मी जायला मोकळा. एकदा का आचारसंहिता लागली की मग त्याचे काही का होईना... त्याही अधिकाऱ्याने या कार्यकर्त्याची मागणी तत्काळ पूर्ण करून टाकली. दोघेही खुशीत निघून गेले.