शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 6:44 PM

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणी टंचाई

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असूनही या गावातील १० हजार लोकांना टँकरच्या एक घागर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नव्हे, तारेवरची कसरत करीत आडातून पाणी शेंदून घ्यावे लागते.  

निलंगा तालुक्यातील हलगरा या गावात तेरणा नदीवरून कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गावात ३६ मिनी वॉटर योजना सुरु केल्या, पण या योजनांपैकी केवळ केवळ दोन मिनी टाक्या सुरू आहेत. २१ विंधन विहिरीपैकी एक चालू असून २० बंद पडल्या आहेत. ११ हातपंप बंद असून आठ जुने पुरातन काळातील बांधकाम केलेले आड बंदच आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत बंद पडल्याने एका टँकरद्वारे तीन आडामध्ये तीन दिवसाला एकदा पाणी सोडले जाते. पाणी आडात पडताच महिला, मुले आणि अबालवृद्धांची एकच धावपळ होते. घागर दोरीने शेंदून पाणी घेण्यासाठी आडावर एकच झुंबड उडते. टँकरमधून पडत असलेले पाणी घागरीत शेंदून घेण्यासाठी लगबग सुरू होते. सदर पाणी टंचाई लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात चार बोअर, विहीर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यातील दोन अधिग्रहणाचे स्रोत आटले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आणखी एका टँकरची व अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून त्यास मान्यता मिळाली नसल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले. 

हलगरा या गावात जलयुक्त शिवार व गावकºयांच्या श्रमदानातून चांगले काम झाले होते. याची दखल घेत २०१७ मध्ये मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गावात भेट देऊन श्रमदान केले व गाव दत्तक घेतले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या गावास भेटही दिलेली नाही. यावर्षी भीषण दुष्काळ पडला. या भागातून वाहणाºया तेरणा, मांजरा नद्या आटल्या आहेत. गावाजवळील शिरसी तळे आटले आहे. पाणी टंचाई तीव्र झाली. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ग्रामस्थ पाणी टंचाईचे चटके निमूटपणे सहन करीत आहेत.  

आडात शेकडो घागरींची गर्दी...गावाची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून तीन आडात टँकरचे पाणी दोन दिवसाला एकदा सोडले जाते. पाणी आडात पडण्याअगोदरच शेकडो रिकाम्या घागरी आडात दोरीच्या साह्याने पाणी पडण्याची वाट पाहात भर उन्हात थांबतात. घरातील कर्ता पुरुष, महिला, आजी, मुले, मुली हातात कळशी, घागर घेऊन धावत सुटतात. जीव मुठीत घेऊन या आडावर पाणी भरले जात आहे.

 

पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाकडे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही लक्षच दिले नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांनी सोमवारी येथे भेट देत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनास भाग पाडू, असे आश्वासन दिले. हलगरा गावात तातडीने टँकर पाठविण्यासाठी तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना फोनवरून सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, किशोर लंगोट, देवदत्त पाटील, मंगेश चव्हाण, भरत पाटील, समीद्दीन देशमुख, सुधीर मसलगे, सुरेश रोळे, दत्ता भिडे, आशीतोष मसलगे, संतोष गंगठडे, दत्ता जोशी, नंदकुमार जोशी आदी उपस्थित होते. 

दुसऱ्या टँकरसाठी प्रस्ताव...हलगरा गावात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. चार विंधन विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. त्यापैकी दोन बंद पडल्या. एका टँकरने आडात पाणी टाकले जात आहे. दुसºया टँकरच्या मागणीसाठी १० दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला असल्याचे ग्रामसेवक निखिल माळी यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई