शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पवित्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 5:49 AM

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे.

मुंबई - खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. त्यानुसार, भावी शिक्षकांना त्यांना काम करावयाच्या २० शाळांचा पसंतीक्रम भरावा लागणार आहे. या नव्या पोर्टलमुळे शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासह संस्थांच्या मनमानीलाही चाप बसेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यापूर्वी खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती़ परंतु आता पवित्र या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील, तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती पवित्र या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक असणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षक भरतीतील गैरव्यवहार रोखणे, तसेच खासगी संस्थांच्या मनमानीला चाप बसणे शक्य होणार आहे. महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मदत कक्षही उभारण्यात आला आहे.कोण करू शकतात अर्ज?अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ० पेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विद्यार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा पात्र विद्यार्थी हे इयत्ता १ली ते ५वी, तसेच इयत्ता ६वी ते ८वी मधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात.इयत्ता ९ वी ते १२ वी साठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ० पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा युजर आयडी असेल. नोंदणी करण्यासाठीची कार्यपद्धती युजर मॅन्युअलमध्ये आहे.असे होणार भरतीचे कामपहिला टप्पा - पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.दुसरा टप्पा - संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये आॅनलाइन, तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे.तिसरा टप्पा - संस्थांच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी २० पसंतीक्रम निवडणे.चौथा टप्पा - गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध करून देणे.

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र