शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या रुचिकाची ‘लेफ्टनंट’ पदावर मोहोर

By admin | Updated: September 25, 2014 00:19 IST

खडतर प्रशिक्षण : ‘ओटीए’ क्वीनसह पाच पुरस्कार

इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील रुचिका प्रकाश पाटील हिने जगातील दुसऱ्या क्रमांकाची खडतर लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या चेन्नई (मद्रास) येथील आॅफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीतून ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत लष्करातील ‘लेफ्टनंट’ या पदावर मोहोर उठवली. या प्रशिक्षणात तिने पाच पारितोषिकांसह ‘ओटीए क्वीन’चा मानाचा किताबही पटकावला. याच अ‍ॅकॅडमीतून अफगाणिस्तान व आफ्रिकन खंडातील सेसेल्स या देशाच्या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले.बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतलेल्या रुचिकाने तिचे वडील कर्नल प्रकाश शंकरराव पाटील-खेडकर (निवृत्त) यांच्या पावलावर पाऊल ठेवत लष्करात जाऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस या परीक्षेत गुणवत्ता यादीत २० वे स्थान पटकावत रुचिकाने चेन्नईच्या अ‍ॅकॅडमीतील प्रवेश निश्चित केला. पुण्याची एन. डी. ए. डेहराडून (उत्तराखंड) येथील लष्करी संस्थांमधून २ ते ३ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. हेच प्रशिक्षण चेन्नईच्या संस्थेत फक्त ११ महिन्यांत देताना विद्यार्थ्यांची कसोटी लागते.रुचिकाने प्रशिक्षण पूर्ण करतानाच बास्केटबॉल या खेळासह बुध्दिमत्ता, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेकविध क्षेत्रात ठसा उमटवत ओटीए क्वीनचाही बहुमान मिळवला. ती ‘लेफ्टनंट’ झाली असून, जोधपूर लष्करी तळावर तिची नियुक्ती झाली आहे. रुचिकाला वडील कर्नल प्रकाश पाटील, आई सौ. तृप्ती पाटील, भाऊ क्षितीज यांचे प्रोत्साहन व काका डॉ. भगवान पाटील, इस्लामपूर मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील, श्रीराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)