शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ, डीलरची चूक;शिक्षा मात्र रिक्षाचालकांना

By admin | Updated: September 16, 2014 00:18 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मीटर पासिंग करून नंबर देण्यात आले. डीलरच्या एजंटने परमीटसह रिक्षाची रक्कम घेऊन नवीन रिक्षा दिल्या.

दीपक जाधव - पुणो
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मीटर पासिंग करून नंबर देण्यात आले. डीलरच्या एजंटने परमीटसह रिक्षाची रक्कम घेऊन नवीन रिक्षा दिल्या. मात्र, प्रत्यक्षात त्या रिक्षांना परमीट नसल्याने त्यांची नोंदणीच न झाल्याचे आरटीओच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने त्या रिक्षा जप्त केल्या आहेत. यामध्ये पै पै करून पैसे जमवून रिक्षा विकत घेतलेले अनेक रिक्षाचालक रस्त्यावर आले आहेत.
रिक्षाचालकांना नवीन रिक्षा घेऊन देण्यासाठी भूषण मोतीवाले हा एजंट म्हणून काम करतो. त्याने परमीट ट्रान्सफर करून नवीन रिक्षा विकत घेऊन देण्यासाठी रिक्षाचालकांकडून पैसे घेतले. त्यामध्ये रिक्षाचे दीड लाख व परमीटचे एक लाख 7क् हजार असे 3 लाख 2क् हजार रुपये तो घेत होता. त्याप्रमाणो त्याने मणिधारी डीलर्स येथून सुरूवातीला काही जणांना रिक्षा विकत घेऊन दिल्या. आरटीओच्या वाहन तपासणी निरीक्षकांकडून या रिक्षांचे मीटर पासिंग करून घेण्यात आले. त्यांना वाहन क्रमांकही देण्यात आले आहेत. तीन लाख रुपये भरल्यानंतर परमीटसह रिक्षा मिळत असल्याचे पाहून अनेक रिक्षाचालकांनी त्याच्याशी संपर्क साधून रिक्षा घेण्यासाठी पैसे भरले. आतार्पयत 2क् रिक्षाचालकांची 45 लाखांची फसवणूक झाल्याचे उजेडात आले आहे.
प्रत्यक्षात त्या रिक्षांवर परमीटच चढविण्यात आले नसून, त्यांचे पासिंगही झाले नसल्याने काही दिवसांनी उजेडात आले. मोतीवाले याच्याकडून रिक्षा घेतलेल्या अनेक जणांच्या बाबत हे प्रकार घडले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुणो शहर व जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांनी 31 जून 2क्14 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार केली. त्या वेळी कवडे यांना याबाबत पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणो कवडे यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा करून त्याचे पुरावे सादर केले. आरटीओच्या वाहन निरीक्षकांनी परमीट नसतानाही मीटर पासिंग 
करून दिल्याच्या, तसेच डीलरकडून गेटपास देण्यात आल्याची कागदपत्रे सादर केली. 
पुरावे समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरटीओच्या अधिका:यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खडबडून जागे झालेल्या अधिका:यांनी तातडीने कारवाई करून परवानाविन्या धावत असलेल्या 2क् रिक्षा जप्त केल्या 
आहेत. संबंधित डीलरविरुद्ध रिक्षाचालकांनी फौजदारी कारवाई करावी, असे पत्र रिक्षाचालकांना देण्यात आले आहे.  
 
दोषींवर कारवाई करू
डीलरने परमीटची तपासणी करूनच वाहन ताब्यात देणो आवश्यक होते. रिक्षाचालकांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. आज रिक्षा जप्त करण्यात आल्यानंतर आता दोषींविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
- जितेंद्र पाटील, 
प्रादेशिक परिवहन अधिकारी
 
डीलरने रिक्षाचालकांना पैसे परत करावेत
डीलरच्या चुकीमुळे रिक्षाचालकांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. रिक्षाचालकांनी दागिने, तसेच जमा केलेली सर्व पुंजी विकून या रिक्षा घेतल्या आहेत. आरटीओने त्यांच्या रिक्षा जप्त केल्यामुळे डीलरने त्यांचे पैसे परत करावेत, तसेच डीलरविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी.
- संजय कवडे, 
अध्यक्ष, पुणो शहर वाहतूक संघटना