Rohit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पवार कुटुंबियांसह लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यातच रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहून अजित पवार यांच्यावर अतीव प्रेम करणाऱ्यांना एक हात जोडून विनंती केली आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या या भावनिक पोष्टमध्ये त्यांनी बारामती येथील कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे. अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या बॅनरवरती स्वर्गीय असा उल्लेख करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.
अजितदादा कायम आपल्यातच असणार
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा.. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज? डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय…, असे रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's funeral, Rohit Pawar urged supporters not to use ' स्वर्गीय' (late). He emphasized Ajit Pawar's continued presence through his work and legacy, requesting respect and remembrance without that term.
Web Summary : अजित पवार के अंतिम संस्कार के बाद, रोहित पवार ने समर्थकों से 'स्वर्गीय' शब्द का उपयोग न करने का आग्रह किया। उन्होंने अजित पवार की विरासत और कार्यों के माध्यम से निरंतर उपस्थिति पर जोर दिया, और उस शब्द के बिना सम्मान और स्मरण रखने का अनुरोध किया।