बारामती: "राज्यात पुण्यातील कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर दाखल होतो, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संशयास्पद मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत," अशा जळजळीत शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये १०० हून अधिक वकिलांसह दोन तास ठाण मांडून बसल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
रोहित पवार म्हणाले की, काल मुंबईत आणि आज बारामतीत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. "आम्ही सर्व कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगितले, तरीही पोलीस एफआयआर घेण्यास तयार नाहीत. बारामती पोलिसांचे हात कुणीतरी बांधले आहेत," असा दावा त्यांनी केला.
VSR कंपनी आणि बड्या नेत्यांचे लागेबांधे
यावेळी रोहित पवारांनी थेट 'एव्हिएशन' मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, व्हीएसआर (VSR) कंपनीचे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यासह केंद्रीय एव्हीएशन मंत्र्यांशी जवळचे संबंध आहे. डीजीसीएने दोन दिवसांपूर्वीच व्हीएसआरची ५ विमाने ग्राऊंडेड केली आहेत. जर या विमानांमध्ये तांत्रिक दोष होता, तर मग तेच विमान अजित दादांना का दिले गेले? डीजीसीए केवळ तांत्रिक तपास करते, गुन्हेगारी स्वरूपाचा नाही. त्यामुळे सीआयडी असो वा सीबीआय, या प्रकरणाचा फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
स्मारकाच्या बैठकीत जाब विचारणार
अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहितीही त्यांनी दिली. "स्मारकाच्या बैठकीत आम्ही हा चौकशीचा मुद्दा निश्चितपणे मांडू. आम्हाला राजकारण करायचे नाही, तर केवळ न्याय हवा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Rohit Pawar criticizes the government for delaying FIR in Ajit Pawar's death, questioning VSR company links to politicians. He demands investigation into the aircraft used by Ajit Pawar and seeks justice, raising concerns about potential foul play.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार की मौत के मामले में एफआईआर में देरी पर सरकार की आलोचना की और वीएसआर कंपनी के नेताओं से संबंधों पर सवाल उठाए। उन्होंने अजित पवार द्वारा इस्तेमाल किए गए विमान की जांच और न्याय की मांग की, संभावित गड़बड़ी पर चिंता जताई।