कोल्हापूरमध्ये रंगली रिक्षा सौंदर्य स्पर्धा

By Admin | Updated: January 26, 2017 20:13 IST2017-01-26T20:08:57+5:302017-01-26T20:13:24+5:30

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 26 - राज्यभरातील रिक्षाचालकांमध्ये औत्सुक्याचा विषय असलेली कोल्हापूर रिक्षा सौंदर्य स्पर्धा कोल्हापूर मध्ये पार पडली. आकर्षक ...

The Ritika Beauty Tournament in Kolhapur | कोल्हापूरमध्ये रंगली रिक्षा सौंदर्य स्पर्धा

कोल्हापूरमध्ये रंगली रिक्षा सौंदर्य स्पर्धा

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 26 - राज्यभरातील रिक्षाचालकांमध्ये औत्सुक्याचा विषय असलेली कोल्हापूर रिक्षा सौंदर्य स्पर्धा कोल्हापूर मध्ये पार पडली. आकर्षक सजावट आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी होतात. यंदा स्पर्धचे हे बारावे वर्ष होते.

महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे राजु जाधव हे गेली बारा वर्षे या स्पर्धेचे आयोजन करतात.कल्याण, पुणे,सोलापूर,पंढरपूर,रत्नागिरी सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूरसह अन्य शहरांमधूनही या स्पर्धेत रिक्षाचालक मोठय़ा हौसेने सहभागी झाले होते. रिक्षाचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करणे हादेखील या स्पर्धेमागचा उद्देश होता, या स्पर्धेत रिक्षाची अंतर्गत आणि बाहय़ सजावट बघितली गेली. तसेच या  सजावटीबरोबरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार केला. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल चार्जर, पंखा,टिव्ही,फ्रिज अशा विविध सुविधा रिक्षाचालक त्यांच्या रिक्षांमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या.

महाराष्ट्रातील १५ शहरांमधून या स्पर्धेत रिक्षाचालक सहभागी झाले होते. स्पर्धेत विजेत्या रिक्षाचालकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेदरम्यान रिक्षाचालकानी रिक्षांची साहसी प्रात्यक्षिकेही सादर केली.

https://www.dailymotion.com/video/x844q1d

Web Title: The Ritika Beauty Tournament in Kolhapur