शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Electricity Bill: वाढीव वीज बिलाचा पुन्हा शॉक! दरवाढ लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:36 IST

३०० हून अधिक युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध लागू झाले असून, पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. संचारबंदीमुळे कुटुंब घरात कैद झाली आहेत. उन्हाळा घामाघूम करत आहे. परिणामी विजेच्या उपकरणांचा वापर वाढला असतानाच आता १ एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा वाढलेला वापर आणि वीज दरात झालेली वाढ वीज ग्राहकांना शॉक देणारी आहे.

महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. बहुवार्षिक वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार दरवर्षी १ एप्रिल रोजी वीज दरवाढ लागू करण्याचे अधिकार महावितरणकडे आहेत, त्यामुळे आता याच कारणामुळे  १ एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत. 

उन्हासह वाढीव बिल घाम काढणार  ५०० युनिटच्या पुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांचा स्थिर आकार दर १०० वरून १०२ रुपये केला आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘वर्क फ्राॅम हाेम’ सुरू असून उकाड्यामुळे वीज वापर वाढला आहे. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याची नाराजी ग्राहकांमध्ये आहे.  

या ग्राहकांना दिलासाn१ ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट ३ रुपये ४४ पैसे मोजावे लागतील. जुना दर ३ रुपये ४६ पैसे आहे. म्हणजे या वर्गवारीतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.n१०१ ते ३०० युनिटमधील ग्राहकांना ७ रुपये ३४ पैसे मोजावे लागणार. जुना दर ७ रुपये ४३ पैसे आहे. म्हणजे यांनाही झळ बसणार नाही.यांना बसणार झळn३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे मोजावे लागतील. जुना दर १० रुपये ३२ पैसे आहे. येथे मात्र ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागेल.n५०० आणि त्या पुढील युनिटच्या ग्राहकांना ११ रुपये ८२ पैसे मोजावे लागतील. जुना दर ११ रुपये ७१ पैसे आहे.

महावितरणचे म्हणणे काय?० ते ३०० युनिटमध्ये २ पैसे कमी झाले आहेत. गरीब माणूस किंवा मध्यमवर्गीयांना दिलासा आहे. कारण या वर्गवारीत हेच ग्राहक असतात. ज्यांचा विजेचा वापर जास्त आहे किंवा एसीसारखी मोठी उपकरणे वापरली जातात, ज्यांचा वीज वापर ३०० ते ५०० युनिट आहे, त्यात ४ पैसे वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही. उच्च वीज वापरकर्त्यांना याची झळ बसेल. शिवाय ही वाढ फार मोठी नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण