शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘रिंगण नाटय़,’ सभा, मोर्चातून श्रद्धांजली

By admin | Updated: August 19, 2014 23:09 IST

डॉक्टरांचा खून म्हणजे विवेकवादाचा खून अशी भावना असलेल्या कार्यकत्र्यानी उद्याचा दिवस ‘निषेध दिन ’म्हणून पाळायचा ठरवला आहे.

पुणो : डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. डॉक्टरांचा खून म्हणजे विवेकवादाचा खून अशी भावना असलेल्या कार्यकत्र्यानी उद्याचा दिवस ‘निषेध दिन ’म्हणून पाळायचा ठरवला आहे. त्यानिमित्ताने श्रध्दांजली, मोर्चा,सभा आणि रिंगण नाटय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
सकाळी 7.3क् वाजता ज्या बालगंधर्व पुलावर डॉ. दाभोलकरांचा खून झाला तेथे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येईल. त्यानंतर निषेध मोर्चा निघेल. सकाळी 1क्.3क् ते 12.3क् या काळात मनोहर मंगल कार्यालय येथे सभा होईल. त्यानंतर दुपारी 1.3क् ते संध्याकाळी 7 र्पयत रिंगण नाटयाच्या दवारे डॉ. दाभोलकरांचे विचार नव्याने आणि वेगळ्या पध्दतीने मांडायचा प्रयत्न होणार आहे.
 सुमारे 4 महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच’ची स्थापना झाली. भाषणापेक्षा किंवा लेखापेक्षा नाटकाच्या माध्यमातून काही विचार जास्त प्रभावीपणो आणि जास्त लोकांर्पयत पोचू शकतात हा विचार या रिंगण नाटयांमागे आहे. सुमारे 25क् कलाकार या उपक्रमात भाग घेणार असून सगळ्यांच्या सहभागातून होणारे नाटक म्हणून याचे नाव रिंगण ठेवण्यातआले आहे. हे सगळे कलाकार आटपाडी, जत, सांगली, मिरज, गडहिंग्लज, इचलकरंजी, शिरगाव, चाळीसगाव, पाचोरा, लातूर, तंदूरबार, शहादा अशा ठिकाणाहून आले आहेत. या रिंगण नाटकांचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले आहे. 
या रिंगण नाटयात 2क् गाणी आणि 2क् नाटके यांचा समावेश आहे. या नाटकांचे विषय स्त्रिया, मुले, बुवाबाजी, जातीयता,अनिष्ट परंपरा, अंधश्रध्दा, ज्यावर डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर काम केले असेच आहेत. या उपक्रमाच्या वेळी डॉ. लागू,नसिरूदिदन शाह उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. उदयाच्या निषेध दिनानंतरही या रिंगण नाटयाचे प्रयोग सुरू ठेवण्याचा ‘अंनिस ’चा मानस आहे.  (प्रतिनिधी)
 
सत्ताधा:यांना खंत ना खेद
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा 1क् महिने पोलिसांनी तपास केल्यावर सीबीआयकडे द्यावा लागला मात्र याबाबत सत्ताधारी वा विरोधी राजकीय पक्षांने कसल्याही प्रकारची खंत किंवा कमीपणाची भावना व्यक्त केली नाही. याचा संताप येतो. कोणालाही तपासची ही दिशा लाजिरवाणी वाटली नाही. वर्षभरात ब:या वाटणा:या काही मोजक्या राजकीय व्यक्तींविषयीचा आदरही कमी होत गेला.तपासाबद्दल बोलले. मात्र कोणीही सरकार नीट तपास करेल असा विश्वास व्यक्त केला नाही. याउलट ही हत्याच राजकारण्यांनी घडवून आणला असल्याची सार्वत्रिक भावना दिसून आली.  तपासातील दिरंगाईविषयी कधीही विरोधी पक्षाने विधानसभेत किंवा बाहेरही सरकारला धारेवर धरले नाही. गुलाबराव पोळांनी प्लॅंचेट प्रकरणात 1क्क् कोटीचा दावा करणं आणि मग स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यावर शांत बसणं याप्रकाराची ही चौकशी करण्याची कोणाला इच्छा झाला नाही.- विनोद शिरसाठ (साधनाचे संपादक)