शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी रिंगणनाट्य!

By admin | Updated: February 3, 2015 01:32 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला १८ महिने पूर्ण होत आहेत.

उस्मानाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला १८ महिने पूर्ण होत आहेत. तपासात अद्याप प्रगती झालेली नसल्याने १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे ‘सॉक्रिटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. पाटील म्हणाले, की दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत, याकरिता केंद्र शासनाकडे यापूर्वीही दाद मागितली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात जातपंचायतविरोधी कायदा व्हावा आणि जातपंचायतीच्या मनमानीला चाप लागावा, यासाठी लढा अधिक तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जातपंचायतीमुळे पीडित झालेल्या १०० गुन्ह्यांची नोंद राज्यभरात असून, एकट्या रायगड जिल्ह्यात ही संख्या ४२च्या घरात आहे. प्रशासन केवळ सामाजिक शांतता निर्माण करण्यावर समाधान मानत आहे. याच अनुषंगाने ८ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरोधात पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जादूटोणाविरोधी कायद्यान्वये राज्यात आतापर्यंत सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत. हा कायदा प्रभावीपणे अमलात येत आहे, मात्र अद्याप त्याची नियमावली तयार नाही. दक्षता अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची व अधिकाराची त्यात स्पष्टता नाही़ ती नियमावली लवकरच पूर्णत्वास यावी, यासाठी अंनिस सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय परिषद घेणारयेत्या २० आॅगस्टला डॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होतील. अंनिसचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या अनुषंगाने आॅगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.