शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यातील घरांची निवृत्त न्यायाधीशांकडून होणार चौकशी

By admin | Updated: September 24, 2014 04:47 IST

मुख्यमंत्री कोट्यातून १९८९ पासून वितरित झालेली २ व ५ टक्के कोट्यातील घरे नियमानुसार लाभार्थींना दिलेली आहेत की नाही

मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून १९८९ पासून वितरित झालेली २ व ५ टक्के कोट्यातील घरे नियमानुसार लाभार्थींना दिलेली आहेत की नाही, याच्या चौकशीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याचे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले़या कोट्यातून घरे वितरित करण्याचे नियम व त्यानुसार या घरांसाठी आलेले अर्ज आणि त्या आधारावर झालेले घरांचे वितरण यांची चौकशी ही समिती करेल़ त्यातून ही घरे घेण्यासाठी किती जणांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले व घरे लाटली हे सिद्ध होईल, असे नमूद करीत ही समिती स्थापन करण्याचे सविस्तर आदेश येत्या सोमवारी दिले जातील, असे न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़या कोट्यातून दोनपेक्षा अधिक घरे घेणाऱ्यांपैकी किती जणांविरोधात आतापर्यंत याबाबत गुन्हे नोंदवले व किती जणांकडून घरे परत घेतली गेली, याचेही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले आहेत़ या कोट्यातून एकच घर घेता येते़ मात्र खोटी माहिती व प्रतिज्ञापत्र सादर करून अनेकांनी या कोट्यातून दोन घरे घेतली आहेत़ तेव्हा याची चौकशी करून हा गैरप्रकार करणाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे़त्याची दखल घेत न्यायालयाने या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश शासनाला दिले़ शासनानेही याची कारवाई सुरू केली़, तरीही न्यायालयाने ही कारवाई अजून पारदर्शक करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार असल्याचे जाहीर केले आहे़ यासाठी आतापर्यंत निवृत्त झालेल्या जिल्हा न्यायाधीशांची यादी सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने उच्च न्यायालय प्रशासनाला दिले आहेत़ (प्रतिनिधी)