शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या खांद्यावर बिहारची जबाबदारी

By admin | Updated: June 10, 2015 03:16 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचारामुळे गोत्या आलेल्या छगन भुजबळांची पाठराखण करीत त्यांच्या खांद्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

पाटणा : राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्यावरून माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भुजबळांची पाठराखण करीत त्यांच्या खांद्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवशीय बैठक पाटणा येथे सुरू आहे. एसीबीने गुन्हा दाखल केल्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले भुजबळ मंगळवारी पाटण्याला रवाना झाले. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी आपले उमेदवार उतरविणार असून भुजबळ मोठी जबाबदारी उचलतील असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. यापूर्वी भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बिहारमध्ये महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसींचा मेळावा घेतला होता. भुजबळ यांची काही महिन्यांपूर्वी पक्षात कोंडी सुरू होती तेव्हा त्यांनी देशभरातील वेगवेगळ््या राज्यांत ओबीसींचे मेळावे घेतले होते.बिहारमधील निवडणुकीबाबत नितीशकुमार व लालुप्रसाद यादव यांच्यासोबत आपली चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. जागावाटपाबाबत चर्चा करताना जेथे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे तेथील जागा मागण्यात येतील, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे तारीक अन्वर हे बिहारमधील खासदार आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल हे देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देतील, असे भाकित पवार यांनी वर्तविले. (विशेष प्रतिनिधी)...............................................मुख्यमंत्री-भुजबळ भेटीची चर्चालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. मात्र या भेटीचा तपशील मिळू शकला नाही. आपण पक्षाच्या बैठकीकरिता बिहारला असल्याचे भुजबळ यांनी सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करुनही ते उपलब्ध झाले नाहीत. तेलगी प्रकरणाच्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भुजबळ यांना लक्ष्य केल्यावर त्यांनी गडकरी यांचीही भेट घेतली होती.---------------अच्छे दिन कुठे दिसले नाहीतमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, पण आपल्याला कुठेही अच्छे दिन दिसले नाहीत, असा टोला पवारांनी मोदींना लगावला. बांगलादेशाची निर्मिती इंदिरा गांधींनी केली तेव्हा भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे कौतुक केले होते, असे सांगत बांगलादेश निर्मितीचे श्रेय भाजपाने लाटू नये, असेही पवार म्हणाले.